भाऊबीज: Bhaubeej 2022 Meaning in Marathi (Muhurat, Story, Wishes) #bhaubeej2022
Bhaubeej 2022 Meaning in Marathi
Bhaubeej 2022 Marathi: दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी हा सण भाऊबीज साजरा केला जातो. पण यावर्षी दिवाळीच्या नंतर दुसऱ्या दिवशी सूर्यग्रहण असल्यामुळे हा सण 26 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.
भाऊबीज हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी हा सन साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाला तिलक लावतात आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात यावेळी 26 ऑक्टोंबरला भाऊबीज साजरी होणार आहे या शुभमुहूर्तावर बहिण भावाला तिलक लावतात त्यानंतर भावाची आरती केली जाते आणि भाऊ बहीण एकमेकांना भेटवस्तू देतात.
Bhaubeej 2022: Shubh Muhurat
भाऊबीज शुभ मुहूर्त:
यावर्षी भाऊबीज 26 ऑक्टोबर रोजी साजरा केली जाणार आहे. या दिवशी भावाला ओवाळण्याचा शुभमुहूर्त 2 तास 15 मिनिटांचा असणार आहे. शुभ मुहूर्त दुपारी 1 वाजून 18 मिनिटांनी ते दुपारी 3 वाजून ते 33 मिनिटापर्यंत असेल.
Bhaubeej 2022: Story in Marathi
भाऊबीज का साजरी केली जाते?
भाऊबीज यासंदर्भात यमराज्याची एक कथा प्रचलित आहे असे म्हणतात की या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी गेले होते. तेथे यमुनेने यमराज झाला भोजन दिले आणि तिलक करून सुखी आयुष्याची कल्पना केली यामुळे यमराज खूश झाले आणि त्यांनी यमुनेला वरदान मागायला सांगितले. तेव्हा यमुना म्हणाली की प्रत्येक वेळी तू या दिवशी माझ्या घरी ये तेव्हा यमराजानी तिला होकार दिला आणि सांगितले की आजपासून जो कोणी भाऊ बहिणीच्या घरी जाऊन तिलक लावेल आणि बहीण भावाला याच प्रमाणे वागवेल त्या भावा बहिणीचे नाते आयुष्यभर प्रेमाचे राहील. अशा भावाला दीर्घ आयुष्य मिळेल तेव्हापासून कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते.
Happy Bhaubeej 2022: Wishes in Marathi
Happy Bhaubeej 2022: Wishes in Marathi: दिवाळी उत्सवातील शेवटचा आणि बहिण भावाच्या नात्यांचा महत्त्वाचा सण म्हणजे “भाऊबीज 2022” रोजी आपण 26 ऑक्टोंबरला साजरा करत आहोत. बहिण भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या द्वादशीला साजरा केला जातो. भाऊबीजेला बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. या भाऊबीजेनिमित्त तुम्हाला तुमच्या भावा बहिणीला आणि नातेवाईकांना भाऊबीजेबद्दल संदेश दिलेले आहेत.
दिवाळीच्या सोनेरी प्रकाशामध्ये पहाट झाली,
आनंदाची उधळण करत 2022 ची भाऊबीज आली. भाऊबीज 2022 हार्दिक शुभेच्छा!
भाऊ राया तुला नवी वाट, नवी दिशा मिळो,
तुझ्या कर्तव्याला धनसंपदा आणि यश लाभो,
या भाऊबीजेला तुला अखंड आयुष्य लाभो. भाऊबीज 2022 शुभेच्छा!
रक्षणाचे वचन, निखळ प्रेमाचे बंधन, घेऊन आला 2022 चा भाऊबीजेचा सण. 2022 च्या भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
नाते बहीण भावाचे,
नाते पहिला मैत्रीचे,
अतूट बंद हे प्रेमाचे. 2022 भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!