Bal Din 2022 Marathi Bhashan

बालदिन मराठी भाषण – Bal Din 2022 Marathi Bhashan (Children’s Day Speech) #Children’sDay2022

Bal Din 2022 Marathi Bhashan

बालदिन मराठी भाषण 2022
आजच्या आर्टिकल मध्ये आपण बाल दिन मराठी भाषण 2022 विषयी माहिती जाणून घेत आहोत. दरवर्षी भारतामध्ये 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. 14 नोव्हेंबर हा दिवस पंडित नेहरू यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.

14 नोव्हेंबर हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना समर्पित आहे. जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले खूप आवडत असे म्हणूनच त्यांचा जन्मदिन हा ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो.

पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलांविषयी खूपच आपुलकी होती ते तासंतास लहान मुलांमध्ये रमून जायचे म्हणूनच 14 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिन बाल दिन म्हणून साजरा केला जातो. लहान मुले त्यांना ‘चाचा’ असे म्हणत. देशाच्या सुवर्ण विकासात मुलांचा महत्त्वाचा वाटा आहे आणि मुले आपल्या देशाची भविष्य आहेत असे ते नेहमी म्हणत.

दरवर्षी बाल दिनाच्या दिवशी शाळांमध्ये, कॉलेजमध्ये अनेक वाद विवाद स्पर्धा होतात. चांगली कामगिरी करणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस दिले जाते तसेच बालदिन निमित्त मुलांना भेटवस्तूही दिल्या जातात.

बालदिन 2022 भाषण मराठी ची सुरुवात कशी करावी

आदरणीय
प्राध्यापक गुरुजी आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो…

सर्वात प्रथम तुम्हाला बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आज आपण इथे बाल दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत.

दरवर्षी भारतामध्ये 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.

मित्रांनो, 14 नोव्हेंबर हा दिवस आपल्या महान भारतीय स्वतंत्र सेनानी आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे. जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलांबद्दल खूपच आपुलकी होती त्यामुळे मुलेही त्यांना चाचा नेहरू म्हणत. त्यामुळेच त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आपण 14 नोव्हेंबर त्यांच्या जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करतो.

पंडित नेहरू ची नेहमी म्हणायचे “आजची मुले भारताचे भविष्य आहे.”
त्यामुळेच त्यांच्या शिक्षण आणि कल्याणावर विशेष लक्ष दिले पाहिजे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुलांमध्ये विकास, शिक्षा, स्वास्थ्य याविषयी भारत सरकारने खूप योजना बनवल्या. पण आजही काही मुलांना त्यांचा मूलभूत अधिकार मिळालेला नाही.

बाल दिन हा तोपर्यंत पूर्णपणे सार्थ होऊ शकत नाही जोपर्यंत भारतातील प्रत्येक मुलाला त्याचे मौलिक अधिकार मिळत नाही.

भारतामधून बाल शोषण आणि बालमजुरी पूर्णपणे नष्ट झाली पाहिजे कोणतेही मूल आर्थिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये. बालकल्याणासाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा लाभ मुलांपर्यंत पोहोचला पाहिजेल बाल दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून बाल हक्काबाबत जनजागृती केली पाहिजे.

बालदिन आणि चाचा नेहरू बद्दल माझे विचार ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.

जय हिंद, जय भारत.

Bal Din 2022 Marathi Bhashan

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon