बैलपोळा मराठी भाषण: Bail Pola Speen in Marathi (Bhashan) ‘श्रावणी पोळा’, ‘भादवी बैलपोळा’ #bailpola
बैलपोळा मराठी भाषण: Bail Pola Speen in Marathi (Bhashan)
आजच्या आर्टिकल मध्ये आपण “बैल पोळा” या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. भारतामध्ये मोठ्या उत्सवामध्ये हा सण साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊया ‘बैल पोळा’ हा सण का साजरा केला जातो आणि या सणाचे महत्व.
पोळा हा सण बैलांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जाणारा सण आहे. भारतीय शेतकऱ्याला त्याच्या शेतात मध्ये काम करण्यासाठी बैल खूप मदत करतो त्यामुळे आपल्याला अन्न मिळते. बैलांचा मान राखण्यासाठी हा सण साजरा केला जातो म्हणून या सणाला ‘बैलपोळा’ असे म्हटले जाते.
दरवर्षी श्रावण महिन्याच्या अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो. या दिवशीही बैलांना सुट्टी दिली जाते त्यांना सजवले जाते. बैलांना अंघोळ घालून त्यांची पूजा केली जाते नंतर रात्री बैलांची मिरवणूक काढली जाते.
महाराष्ट्रामध्ये दोन बैल पोळा साजरा केले जातात एक श्रावण महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो ज्याला ‘श्रावणी पोळा’ असे म्हटले जाते आणि दुसरा भाद्रपद महिन्यातील बैलपोळ्याला ‘भादवी बैलपोळा’ असे म्हटले जाते.
बैलपोळा मराठी भाषण: Bail Pola Marathi Bhashan
बैलपोळा मराठी भाषणाची सुरुवात कशी करावी?
आदरणीय मुख्याध्यापक, प्राचार्य आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो…
आज आपण येथे बैल पोळा या सणानिमित्त येथे जमलो आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की श्रावण महिन्याच्या अमावस्येला महाराष्ट्रामध्ये शेतकरी ‘बैल पोळा’ हा सण साजरा करतात. हा दिवस बैलांना सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो. बैल हा शेतकऱ्याचा चांगला मित्र असतो, शेतामध्ये अन्न पिकवण्यास तो शेतकऱ्याला मदत करतो.
बैल हा पाळीव प्राणी आहे. त्याचे डोळे मोठे असतात, त्याला दोन शिंगे आणि एक शेपूट असते, तो काळ्यापांढर्या आणि तांबूस रंगाचा असतो. बैल हा खूपच ताकदवान प्राणी आहे आणि महत्वाचे तो एक शाकाहारी प्राणी आहे. भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे शेती करण्यासाठी बैलाचा वापर केला जातो तसेच खेडेगावांमध्ये बैलांचा खूपच उपयोग होतो.
पोळा हा सण खास करून बैलांसाठी साजरा केला जाणारा सण आहे. या दिवशी शेतकरी बैलाला सुट्टी देतात त्यांना सजवतात त्यांची पूजा करतात त्यांना पुरणपोळी खाऊ घालतात. शेतकऱ्याचे संपूर्ण जीवन बैलावर अवलंबून असते म्हणून शेतकरी ‘बैलपोळा’ हा सण साजरा करतात.
बैल पोळा या सणाच्या दिवशी शेतकरी लवकर उठून आपल्या बैलांना स्वच्छ आंघोळ घालतो, त्यांच्या शिंगांना रंग देतो, त्यांच्या अंगाला तेल लावून मालिश करतो. बैलाला विविध रंगाने रंगवून त्याच्या पायामध्ये तोडे, शिंगांना गोंडे तसेच गळ्यामध्ये घागर माळा घालून बैलांना सजवतो. बैलांच्या पाठीवर रंगीबिरंगी झालर घालतो.
अशाप्रकारे भारतामध्ये विशेषता महाराष्ट्रामध्ये ‘बैलपोळा’ हा सण साजरा केला जातो. यावरून आपल्याला समजते की बैल हा आपल्यासाठी किती महत्त्वाचा प्राणी आहे आणि या प्राण्याबदल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.