August Important Day In Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण ऑगस्ट महिन्यामध्ये महत्त्वपूर्ण दिवसां (August Month Important Days) बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये काही विशेष दिन साजरे केले जातात; ज्याचे जगामध्ये आणि आपल्या भारतामध्ये खूप महत्त्व आहे. हे दिवस का साजरे केले जातात आणि या दिवसांचे काय महत्त्व आहे या मागचा इतिहास आणि संकल्पना याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत.
August Important Day In Marathi
ऑगस्ट महिन्यातील महत्वपूर्ण दिवस खालीलप्रमाणे.
3 August: World Sanskrit Day दरवर्षी 3 ऑगस्ट हा दिवस जागतिक संस्कृत दिवस म्हणून साजरा केला जातो. संस्कृत ही प्राचीन काळी संपूर्ण भारतामध्ये बोलली जाणारी भाषा होते आणि याच भाषेतून मराठी हिंदी आणि इतर भाषांचा उगम झाला आहे. काही इतिहासकारांच्या मते हे संस्कृत ही भाषा जगातील सर्वात जुनी भाषा आहे जगातील सर्वात जुनी लिपी ही चायनीज लिपी आहे याचे पुरावे चीन या देशातील पुरातन काली विभागाने दिले आहे. संस्कृती या भाषेमध्ये महाभारत आणि रामायण सारख्या कथा आणि काव्य लिहिले गेले आहे भारताचे सर्वात प्राचीन भाषा आहे.
4 August: USA Coast Guard Day दरवर्षी चार ऑगस्ट हा दिवस यूएसए मध्ये कोस्ट गार्ड डे म्हणून साजरा केला जातो हा अमेरिकेमध्ये महत्वपूर्ण दिवसांपैकी एक आहे.
6 August: Hiroshima Day 1945 मध्ये अमेरिकेने या देशावर अणू बॉम ने हल्ला केला होता. जगामध्ये पुन्हा युद्ध न व्हावे आणि पुन्हा अनु बॉम चा वापर करू नये यासाठी दरवर्षी सहा ऑगस्ट हा दिवस हिरोशिमा डे म्हणून साजरा केला जातो. जपान वर पडलेल्या दोन अणू बॉम नंतर युद्ध संपुष्टात आले होते. संपूर्ण माहिती
August First Friday: International Beer Day दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी इंटरनॅशनल बिअर डे साजरा करण्याची प्रथा आहे एक दिवस आपल्या मित्रांसमवेत किंवा कुटुंबासमवेत रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये दोन स्वतःला निवांत करण्यासाठी या दिवसाची स्थापना करण्यात आलेली आहे हा दिवस का साजरा करतात याविषयी डिटेल्स मध्ये माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. संपूर्ण माहिती
7 August: National Handloom Day
9 August: Nagasaki Day 1945 मध्य अमेरिकेने सहा ऑगस्ट रोजी हिरोशिमा या शहरावर अणू बॉम्ब टाकला होता. तरी सुद्धा जपान शरणागती पत्करायला तयार नव्हता त्यामुळे नाईलाज असल्यामुळे अमेरिकेने पुन्हा दोन दिवसानंतर जपानच्या नागासाकी या शहरावर अणू बॉम्ब टाकला होता नागासाकीवर पडलेल्या बॉम्ब मुळे द्वितीय विश्व युद्ध संपुष्टात आले.
10 August: Biofuel Day दरवर्षी 10 ऑगस्ट हा दिवस जैवइंधन म्हणून साजरा केला जातो. सध्या निसर्गाची होत असलेली हानी आणि पेट्रोल डिझेल सारख्या वाढणाऱ्या किमती या समस्येवर उपाय म्हणून जैवइंधन हा दिवस दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या दहा तारखेला साजरा केला जातो. संपूर्ण माहिती
10 August: World Lion Day दरवर्षी 10 ऑगस्ट हा जगभरामध्ये “जागतिक सिंह दिन” म्हणून साजरा केला जातो. सध्या सिंहाची झपाट्याने कमी होत असलेली संख्या लक्षात घेऊन वाघा विषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या दहा तारखेला जागतिक सिंह दिन साजरा केला जातो. संपूर्ण माहिती
12 August: International Youth Day दरवर्षी 12 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस तरुणांच्या समस्येकडे लक्ष देणारा दिवस आहे; आणि या दिवसाची निर्मिती सध्या तरुणांना भेडसावत असणाऱ्या बेरोजगारी सारख्या समस्यांवर प्रकाश टाकते. संपूर्ण माहिती
12 August: World Elephant Day दरवर्षी 12 ऑगस्ट “जागतिक हत्ती दिन” म्हणून साजरा केला जातो. सध्या हस्तीदंतसाठी रोज दहा हत्ती आफ्रिकेमध्ये मारले जातात. हत्ती या प्राण्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी 12 ऑगस्ट हा दिवस जागतिक हत्ती दिवस म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण माहिती
13 August: International Left Handers Day दरवर्षी 13 ऑगस्ट हा दिवस “इंटरनॅशनल लिफ्ट हँडरस डे” म्हणून साजरा केला जातो; म्हणजेच जी लोकं डाव्या हाताचा वापर करतात अशा लोकांसाठी हा दिवस साजरा केला जातो. संपूर्ण माहिती
13 August: World Organ Day दरवर्षी संपूर्ण जगामध्ये 13 ऑगस्ट हा दिवस “वर्ल्ड ऑर्गन डे” म्हणून साजरा केला जातो. ज्या कोणी व्यक्तीला अवयवांची गरज आहे अशा व्यक्तींसाठी ऑर्गन ची खूप मोठी आवश्यकता असते ऑर्गन दान केल्याने तुम्ही एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकता. जगामध्ये ऑर्गन विषयी जनजागृती करण्यासाठी या दिवसाची स्थापना करण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती
15 August: Independence Day in India 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस “इंडिपेंडेंस डे” स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच 15 ऑगस्ट हा दिवस “साऊथ कोरिया” या देशाचा सुद्धा स्वतंत्र दिवस आहे. संपूर्ण माहिती
19 August: World Photography Day दरवर्षी 19 ऑगस्ट हा फोटो प्रेमींसाठी साजरा केला जातो ज्या व्यक्तींना फोटोग्राफीची आवड आहे अशा व्यक्तींना सन्मान देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. संपूर्ण माहिती
20 August: World Mosquito Day दरवर्षी 20 ऑगस्ट हा दिवस “जागतिक मच्छर दिन” म्हणून साजरा केला जातो. “डॉक्टर रोनाल्ड रॉस” यांनी 1897 मध्ये पहिल्यांदा सिद्ध केले की मच्छरा द्वारे व्यक्तींना मलेरिया हा रोग होतो. हा दिवस का साजरा केला जातो? संपूर्ण माहिती
20 August: Sadbhavna Diwas दर वर्षी 20 ऑगस्ट हा दिवस “सद्भावना दिवस” म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्म दिन आहे. हा दिवस का साजरा केला जातो? संपूर्ण माहिती
20 August: Akshay Urja Day भारतामध्ये अक्षय ऊर्जेला खुपच महत्व दिले जाते त्यामुळे दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या 20 तारखेला हा दिवस साजरा केला जातो? अक्षय ऊर्जा दिवस माहिती आणि महत्त्व. संपूर्ण माहिती
29 August: Women’s Equality Day महिला समानता दिवस हा दिवस सर्वात प्रथम अमेरिकेमध्ये साजरा केला गेला होता अमेरिकेमध्ये राहणाऱ्या स्त्रियांनी त्यांच्या स्वतंत्र हक्कासाठी अमेरिकेमध्ये खूप मोठा लढा दिला होता. संपूर्ण माहिती
Final Word:-
August Important Day In Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.