ATAL SETU Information in Marathi

ATAL SETU Information in Marathi: Thumbnail वाचून तुम्हाला देखील आश्चर्य वाटले असेल! की प्रत्येक गाडी असलेल्या व्यक्तीला हा रस्ता वापरण्यासाठी 1.5 लाख रुपये वर्षाला खर्च द्यावा लागेल का?

लवकरच “श्री. अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंक” (Atal Bihari Vajpayee Trans Harbor Link) हा पूल नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. ऑफिशियली या पुलाचे नाव “द मुंबई ट्रान्स हार्बर लिंक” (The Mumbai Trans Harbor Link) असे होते नंतर याला “अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंक‘ या नावाने ओळखले जाऊ लागले.

हा प्रोजेक्ट मोदी सरकारच्या कार्यकाला दरम्यान बांधला गेलेला आहे. हा प्रोजेक्ट पूर्ण करायला सरकारला तब्बल 17843 करोड (USD$2.2 billion) रुपये लागले आहे. या पुलाचे अंतर 21.8 किलोमीटर आहे. शॉर्ट मध्ये याला “अटल सेतू” (ATAL SETU) या नावाने देखील ओळखले जाते. आणि हा भारतातील सर्वात लांबीचा पूल आहे.

यापुलाआधी आसाम मधील “भूपेन हजारी” हा पूल भारतातील सर्वात मोठा पूल होता आता याचा रेकॉर्ड मोडला आहे ‘अटल सेतू‘ या पुलाने. भूपेन हजारी हा पूल भारतातील सर्वात लांबीचा पूल होता आणि याची लांबी 9 किलोमीटर होती. आणि हा फुल क्रॉस करण्यासाठी आपल्याला 1.5 तासाचा 20 मिनिटे कालावधी लागत असे.

राम सेतू मराठी माहिती: Ram Setu Information in Marathi

ATAL SETU Distance

हा पूल नवी मुंबई ते मुंबई हे अंतर 20 मिनिटांमध्ये कापणार आहे त्यामुळे हा भारतातील सर्वात वेगवान आणि सर्वात मोठा पूल असणार आहे. हा भारतातील सागरावर बनलेला सर्वात लांबीचा पूल आहे.

सॅटॅलाइटच्या मदतीने जर तुम्ही हा पूल पाहिला तर सर्वात जास्त लांबीचा आणि सुंदर असा हा पूल आहे. ह्या पुलाचे उद्घाटन माननीय “श्री. नरेंद्र मोदी” यांनी केले वर्ष 2014 मध्ये त्यांनी या पुलाच्या बांधणी विषयी संसदेमध्ये प्रस्ताव मांडला होता. अटल सेतूची संकल्पना जपानचे पूर्व प्रधानमंत्री ‘शिजो अंबे‘ यांनी श्री नरेंद्र मोदी यांना दिली होती. (शिजो अंबे यांनी नरेंद्र मोदी यांना सांगितले होते की जर तुम्हाला नवी मुंबई आणि मुंबई यांचा विकास करायचा असेल तर तुम्हाला या दोन्ही शहरांना जोडण्यासाठी एक फुल बांधावा लागेल) हा पूल बांधण्यासाठी जपान सरकारने भारताला कर्ज देखील दिलेली आहे. (जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी) द्वारे भारताला कर्ज दिले गेले होते.

हा फुल भारताला 100 वर्ष सेवा देईल असे सांगितले जात आहे. पण हा पूल वापरण्यासाठी नागरिकांना वर्षाला टॅक्स रूपामध्ये खूप सारा पैसा द्यावा लागेल?

समजा एखाद्या व्यक्तीकडे कार असेल आणि त्याला मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास करायचा असेल! तर तुम्हाला मंथली पास घ्यावा लागेल. तर अशावेळी तुम्हाला महिन्याला 12,500/- रुपये द्यावे लागेल. आणि जर आपण वर्षभराचा विचार केला तर तुम्हाला 1.5 लाख रुपये खर्च येऊ शकतो.

ATAL BIHARI VAJPAYEE SEWARI NHAVA SHEVA ATAL SETU

Type Of Vehicles

TYPES OF VEHICLESSINGLE JOURNEY ₹RETURN JOURNEY ₹DAILY PASS ₹MONTHLY PASS ₹
CAR250/-375/-625/-12500/-
LCV/MINIBUS400/-600/-1000/-20000/-
BUS TO 2 AXLE TRUCK830/-1245/-2075/-41500/-
MAV (3 AXLE)905/-1360/-2265/-42250/-
MAV (4 to 6 AXLE)1300/-1950/-3250/-65000/-
OVERSIZED1580/-2370/-3950/-79000/-

या टॅक्समुळे सामान्य जनता थोडीशी नाराज आहे. कारण की एवढी जास्त किंमत एक सामान्य व्यक्ती वर्षाला देऊ शकत नाही. त्यामुळे या पुलाचा वापर करण्यावर आकारण्यात येणाऱ्या किमतीमुळे सामान्य जनता थोडीशी नाराज असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon