Lyft कंपनीचे CEO David Risher यांनी एक अनाउन्समेंट केलेली आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की लवकरच ते त्यांच्या कंपनीतील 100 कर्मचारी काढून टाकणार आहेत. 2023 च्या सुरुवातीपासूनच मोठ मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात केली आहे त्यामध्ये गुगलची कंपनी अल्फाबेट, फेसबुक अमेझॉन यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
2023 पासूनच कार्तिक मंदीचे जाळे संपूर्ण जगामध्ये पसरत चाललेले आहे त्यामुळे अनेक कंपन्या आपले अस्तित्व टिकवण्यासाठी कंपनीतील कर्मचाऱ्यांची कपात करत आहे.
Lyft कंपनीचे सीईओ डेव्हिड रिशेर यांनी त्यांची मोठी प्रतिस्पर्धी कंपनी उबेर यांच्या भाडे बरोबर तुलना करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कपात केलेली आहे ज्यामुळे कंपनीला अतिरिक्त भार उचलावा लागून नये.
यूएसए मधील वॉल स्ट्रीट जनरल ने याविषयी माहिती दिलेली आहे. यामध्ये किती कर्मचारी काढून टाकण्यात येतील याबद्दल पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही तरीपण हे सत्र असेच पुढे चालू राहणार आहे.