“वारिस पंजाब दे चे प्रमुख अमृतपाल सिंह यांना पंजाब मधून अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना आसामच्या दिब्रूगड तुरुंगामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे.”
भारतात खलिस्थान मागणी करणाऱ्या ‘वारिस पंजाब दे’ चे अध्यक्ष आणि प्रमुख अमृतपाल सिंग यांना पंजाब मधून अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी त्यांना पंजाब मधील मोगा जिल्ह्यातील रोडे गावातून अटक केल्यानंतर त्यांचे आसाम मधील दिब्रूगड तुरुंगामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे.
अमृतपाल सिंग हा खलिस्थान समर्थक प्रचारक आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत आरोपांचा सामना करत असलेल्या वारीस पंजाब दे संघटनेचा प्रमुख आहे ज्यांना 23 एप्रिल रोजी मोहा जिल्ह्यातून अटक करण्यात आलेली आहे. अमृतपाल सिंग अटक पोलिसांनी एक महिन्यानंतर केलेले आहे आणि त्यांच्या संघटने विरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे.
राज्यातील शांतता आणि सौहाद धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्याविरुद्ध त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
“अमृतसर पोलिस आणि पंजाब पोलिसांच्या गुप्तचर शाखेने संयुक्त ऑपरेशन केले. पंजाब पोलिसांच्या ऑपरेशनल इनपुटच्या आधारे तो रोडे गावात होता. त्याला चारही बाजूंनी वेढले गेले होते, गावाला पंजाब पोलिसांनी वेढले होते,” महानिरीक्षक डॉ. पोलीस सुखचैन सिंग गिल यांनी सांगितले.
ज्या गुरुद्वारामध्ये अमृतपाल उपस्थित होता, त्याचे पावित्र्य राखण्यासाठी पोलिसांनी प्रवेश केला नाही.
“पावित्र्य राखण्यासाठी, पोलिसांनी गुरुद्वारामध्ये प्रवेश केला नाही आणि आता त्याच्याकडे पळून जाण्याचा कोणताही मार्ग नाही हे त्याला ठाऊक असल्याने, त्याला पंजाब पोलिसांनी वेढले होते. गावाला पंजाब पोलिसांनी चारही बाजूंनी वेढले होते,”
अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी आज सकाळी ६.४५ च्या सुमारास रोडे गावात अटक केली. अमृतसर पोलिस आणि पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाने संयुक्त कारवाई केली. पंजाब पोलिसांच्या ऑपरेशनल इनपुटच्या आधारे तो रोडे गावात होता. पावित्र्य राखण्यासाठी पोलिसांनी गुरुद्वारा साहिबमध्ये प्रवेश केला नाही. त्याला NSA अंतर्गत दिब्रुगडला नेण्यात आले आहे.