राम सेतू मराठी माहिती: Ram Setu Information in Marathi (Meaning, History, Distance, Story, Adams Bridge) #ramsetu
आजच्या आर्टिकल मध्ये आपण ‘रामसेतू’ भगवान श्रीरामांनी बांधलेल्या पुला विषयी माहिती जाणून घेणार आहोत. भगवान श्रीरामांनी लंकेत जाण्यासाठी वानर सेनेच्या मदतीच्या सहाय्याने राम सेतू बांधला होता. आजही हा पूल अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते.
भारताच्या दक्षिणेकडील धनुष्यकोडी आणि श्रीलंकेच्या उत्तर पश्चिमेकडील पंबन दरम्यान समुद्राच्या 48 किमी रूंद पट्ट्याच्या रुपात उदयास आलेल्या प्रदेशाची उपग्रह प्रतिमा 1993 मध्ये अमेरिकन स्पेस रिसर्च इन्स्टिट्यूट (NASA) नासाने कॅप्चर केली होती त्यावेळी भारतामध्ये याविषयी राजकीय वादाचा जन्म झाला आणि या पुलाला ‘राम का पुल’ किंवा ‘रामसेतू’ असे नाव पडले 14 डिसेंबर 1966 रोजी रामसेतू ची प्रतिमा अंतराळातून मिळवली. 22 वर्षानंतर ISS 1A तामिळनाडू वरील रामेश्वरम आणि जाफना बेटांमध्ये पाण्याखालील भूभाग शोधला आणि फोटो काढले त्यामुळे अमेरिकन उपग्रहाची प्रतिमेची पुष्टी झाली.
Ram Setu Information in Marathi
राम सेतू हा भारत देशाला शेजारील श्रीलंकेशी जोडणारा नेसर्गिक फुल आहे. निसर्गाचे भव्य रचना कोणालाही तिच्या सौंदर्याने मोहित करू शकते. 50 किलोमीटर लांबीचा आणि ३ किमी रुंद धनुष्यकोडी (भारतातील पंबन फुलाचे टोक) पासून शोल्सच्या मालिकेपासून सुरू होतो आणि श्रीलंकेच्या मन्नार बेटावर संपतो.
रामसेतू या फुलाला ‘ॲडम्स ब्रिज’ या नावाने देखील ओळखले जाते. हा एक पौराणिक पूल आहे ज्यामध्ये मुख्यता: कोरल रिप्स आणि वाळूच्या किनाऱ्याचा समावेश आहेत. या पौराणिक पुलाच्या मूळ आणि रचनेशी संबंधित अनेक विवाद देखील आहेत. धनुष्यकोडी हा रामेश्वर बेटाचा शेवटचा बिंदू आहे आणि रामसेतू पॉईंट धनुष्यकोडी पासून काही मीटर अंतरावर आहे. ही शतकानुशतके जुनी रचना आहे ज्याचा उल्लेख ‘वाल्मिकी यांच्या रामायणात’ देखील दिसून आलेला आहे त्यामुळे हा सर्वात जुना पूल असल्याचे मानले जाते.
Ram Setu: Meaning in Marathi
राम सेतु म्हणजे भगवान रामाने बांधलेला पूल.
रामसेतू पुलाचा इतिहास (History of Ram Setu Bridge)
काही संशोधक आणि कागदपत्रांनुसार 30 मैल लांबीचा पूल मन्नारच्या आखाताला पाल्क स्ट्रेट पासून वेगळा करतो. 15 व्या शतकापर्यंत तो चालण्या योग्य होता 15 व्या शतकात रामेश्वर मंदिराच्या नदीवरून तो दिसत असे. रामसेतू प्राचीन काळात आणि 1480 पर्यंत समुद्रसपाटीपासून वर होता रामायण काळात किंवा रामाच्या काळामध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुवा म्हणून रामसेतू काम करत असे.
याच पुलावरून माता सीतेला वाचवण्यासाठी राम आणि त्यांचे सैन्य लंकेत पोहोचले होते त्यामुळे या पुलाला ‘रामसेतू’ या नावाने देखील ओळखले जाते. पण या रामसेतू चा निर्मितीचा इतिहास अत्यंत वादग्रस्त विषय आहे.
अमेरिकेच्या नासा रिसर्च सेंटरने या पुलाला वाळूची साखळी असे म्हटले आहे. न्यायालयीन प्रकरणे आणि प्रतिज्ञापत्रे जारी केल्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने रामसेतू ही मानवनिर्मित रचना असल्याचा निकाल दिला. 15 व्या शतकापर्यंत हा पूल चालता येण्यासारखा होता नंतर वादळामुळे त्याची पडझड झाली. 1480 मध्ये चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या पूर्वी हा पूल समुद्रसपाटीपासून उंच होता असे रामसेतू च्या इतिहासकारांनी म्हटले आहे.
रामसेतू या पुलाला भेट देण्याची उत्तम वेळ कोणती आहे?
रामसेतू या पुलाला भेट देण्याची उत्तम वेळ या प्रदेशातील हवामानावर निर्भर असते. नोव्हेंबर ते मार्च दरम्यान सर्वोत्तम वेळ आहे रामसेतू ला भेट देण्याची.
रामसेतू हा पूल किती वर्ष जुना आहे?
रामसेतू या पुलाचे वय अंदाजे 3500 वर्ष आहे किंवा 7000 जुने असल्याचे सांगितले जाते तसेच आपल्या पुराणांमध्ये रामसेतू चे वय 17 लाख वर्ष सांगितले आहे. म्हणजेच या फुलाविषयी अजूनही कुणाचे एकमत नाही.
राम सेतु कुठे आहे?
राम सेतू भारताच्या रामेश्वर बेटावरून श्रीलंकेच्या मन्नार बेटाच्या मध्यभागी आहे.
रामसेतु ची लांबी किती आहे?
रामसेतु ची लांबी 48 ते 50 किमी आणि रुंदी 3 किमी आहे.