आजचा दिनविशेष – Marathi dinvishesh 29 October 2023
Marathi dinvishesh 29 October 2023:
- महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना (1894)
- बेनिटो मुसोलिनी इटलीचे पंतप्रधान बनले (1922)
- महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान (1958)
- संयुक्त अरब प्रजासत्ताकमधून सीरिया देश बाहेर पडले (1961)
- टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला (1964)
- विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा होमी भाभा पुरस्कार डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर (1994)
- स्वदेशात बनविलेली कामिनी ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्कम येथे कार्यान्वित करण्यात आली (1996)
- मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड (1996)
- माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला ‘माणिकरत्न पुरस्कार’ गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर (1997)
- अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर (1997)
- चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान (1999)
- दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार (2005)
- डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली (2008)
मराठी दिनविशेष हा आपल्याला आपल्या इतिहासात आणि संस्कृतीतल्या महत्त्वाच्या घटना आणि व्यक्तींच्या आठवणी करून देतो. या दिवशी आपण आपल्या मुलांना आणि भावी पिढीला आपल्या देशाचा आणि संस्कृतीचा गौरवशाली इतिहास सांगू शकतो.