भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवीन संसद भवन यांच्या उद्घाटनात 75 रुपयाचे कॉईन आणि विशेष स्मारक डाक तिकीट जारी केलेले आहे.
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवन उद्घाटनाच्या वेळी एक विशेष डाक तिकीट आणि 75 रुपयाचा कॉइन जारी केलेला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालेले आहे, त्यामुळेच “आजादी के 75 अमृत वर्ष” या थीम सह हा कॉइन जारी केलेला आहे.
चला तर जाणून घेऊया तुम्ही हा कॉइन ऑनलाईन कुठे विकत घेऊ शकता याबद्दल संपूर्ण माहिती.
कसा असणार आहे 75 रुपयाचा कॉईन?
केंद्रीय वित्त मंत्रालयांनी आर्थिक विभाग द्वारा जारी नोटिफिकेशनच्या अनुसार या कॉइनचे वजन 34. 65 ग्राम किंवा 35.35 ग्रॅम असेल. “मंत्रालयाच्या नोटिफिकेशन नुसार या कॉइन च्या मधोमध ‘अशोक स्तंभ’ असेल ज्याच्यावर देव नागरी लिपी मध्ये ‘भारत’ असे लिहिले असेल आणि इंग्लिश मध्ये ‘इंडिया’ असे लिहिले असेल.”
75 रुपये चा कॉइन कुठे खरेदी करावा?
हा कॉइन तुम्ही अनेक वेबसाईटवर खरेदी करू शकता. ऑनलाइन तुम्हाला हे कॉइन सहज मिळून जातील.
75 रुपये कॉइन ची किंमत किती असेल?
मित्रांनो जर तुम्ही हा कॉइन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हा कॉइन 3494 रुपये पासून ते 3781 किमतीपर्यंत पडू शकतो. वेगवेगळ्या वेबसाईट नुसार वेगवेगळ्या किमती ठरवल्या जाऊ शकतात. सध्या हा कॉइन कोणत्याही ऑनलाईन वेबसाईटवर उपलब्ध नाही. लवकरच हा कॉइन ऑनलाईन उपलब्ध केला जाईल.
मंत्रालयाने जारी केलेले कॉइन महाग असतात?
मित्रांनो हे कॉइन भारतीय मंत्रालयाने विशेष दिवशी जारी केल्यामुळे याला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो त्यामुळेच हे कॉइन इतके महाग असतात तसेच हे कॉइन 50% चांदीने बनवलेले असतात. या कॉइन मध्ये पन्नास टक्के तांबे आणि निकल असते याच कारणामुळे हे कॉइन इतके महाग असतात.
निष्कर्ष
आशा आहे मित्रांनो तुम्हाला भारतीय संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त 75 रुपयाच्या कॉइन बद्दल माहिती मिळाली असेल, याबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.