विज्ञान आणि मानव १०० ओळी निबंध | Science and Human 100 Lines Essay

प्रस्तावना
विज्ञान आणि मानव १०० ओळी निबंध (Science and Human 100 Lines Essay) विज्ञान आणि मानव वैज्ञानिक प्रगती मानवाच्या गरजेतून झालेल्या संशोधनाचे फलित, मानवाचे दैनंदिन जीवन विज्ञानामुळे सोपे व सुखाचे, उपलब्धी, सुखसोई, दळणवळण, मनोरंजन, आदी मानव जीवनाचा विकास हरितक्रांती संरक्षण साधने, औषधे, व्यापारवृद्धी, गती जीवन व आधुनिक जीवन यात फरक, विज्ञाना कडून अपेक्षा, प्रदूषण नियंत्रण, नवे उर्जास्त्रोत इत्यादी विज्ञानाच्या विध्वंसक रूपावर मानवी नियंत्रणाची गरज.

विज्ञान आणि मानव १०० ओळी निबंध | Science and Human 100 Lines Essay

संस्कृत भाषेत एक सुंदर सुभाषित आहे; ते असे की विज्ञान हा मानवाला मिळालेला एक प्रभावी डोळा आहे. त्याचा उपयोग जो करणार नाही. तो खरोखरच आंधळा आहे. खरे पाहता मनुष्य हा इतर प्राण्यांपेक्षा दुबळा आहे. त्याच्या जवळ हिंस्त्र प्राण्यासारखा नखें व दात नाहीत, त्याला पक्षासारखे उडता येत नाही. वाघासारखे त्याचे घ्नेदीय ही नाहीत. पण आज हा माणूस सर्व प्राण्यांत आपल्या बुद्धीच्या बळाने विज्ञानाच्या किमया व श्रेष्ठ व प्रबळतम ठरलेला आहे.

विज्ञानाने माणसाला चाकाचे रहस्य सांगितले आणि माणसाची गती वाढली. विजेचा शोध लागल्यावर बैलगाडी वापरणारा माणूस आगगाडी, विमानातून फिरू लागला तो रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात चंद्रावर जाऊन पोचला. स्वतःजवळ नसलेले उडण्याचे सामर्थ्य त्यांनी विज्ञानाच्या सहाय्याने मिळवले माणसाने आता विज्ञानाच्या उपयोग करून आपल्या शास्त्रांना प्रबळत्तम केले आहे.

मानवाच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्राला विज्ञानाने स्पर्श केलेला आहे. माणसाच्या उपजीविकेसाठी शेतातही आवश्यक आहे. विज्ञानाच्या सहाय्याने माणसाने अनेक खते संकरित बी-बियाणे आणि अनेक कृषी अवजारे शोधून काढली त्यामुळे कृषी उत्पादनात प्रचंड क्रांती झाली आहे. श्वेतक्रांती करून माणसाने दुधाची चंगळ केली आहे. आता अनेक यंत्र शोधून त्याने नाशवंत अन्न टिकाऊ स्वरूपात आणले आहे.

विज्ञानाच्या सहाय्याने माणसाने आपले आयुमान हे खूप वाढवलेले आहे. आज माणसाने वैद्यकीय क्षेत्रात अनेक प्रयोग केले आहेत त्यामुळे माणूस दीर्घायुष्य झाला आहे अनेक असाध्य आजारांवर त्याने मात केली. विविध अवयवांचे रोपण आता माणूस करू शकतो. त्वचा प्रत्यारोपण, रक्तात बदल अशा अशक्य गोष्टी माणसाला आज विज्ञानाच्या सहाय्याने शक्य झाल्या आहेत.

माणसाने विज्ञानाच्या सहाय्याने अनेक चमत्कार साध्य केले आहेत. ‘टेस्ट ट्यूब बेबी’ हा त्यापैकी एक प्रकार वैज्ञानिकांचे प्रयोग सतत चालू असतात क्लोनिंग हे त्यातील एक पुढचे पाऊल आहे. डोली पासून त्यांनी तशीच डोली तयार केली आहे. संगणक आणि इंटरनेट ही आजच्या युगातील विज्ञानाचे फार मोठी किमया हे हजारो किलोमीटरवर असलेल्या प्रियजनांचा आवाज घरबसल्या आपण स्पष्ट ऐकू शकतो. पुण्यात आजोबांनी गणपतीची आरती केली आणि त्याच वेळी अमेरिकेतील नाती नी आरती म्हटली हे शक्य झाले विज्ञानामुळेच. आज इंटरनेटने माणसांना ज्ञानाचा धबधबा खुला केला आहेत चार देशातील राष्ट्रप्रमुख आपल्या देशात बसून एकत्र चर्चा करू शकतात ते केवळ विज्ञानामुळेच विज्ञानाने सारे जग जवळ आणले आहे.

असे हे विज्ञान मानवाला मिळालेले एक वरदान आहे, पण त्याचा अतिरेक व दुरुपयोग वाईटच. रासायनिक खतांमुळे पिके चांगली येतात हे दिसू लागताच आपण त्याचा भरमसाठ वापर करू लागलो त्यामुळे पीक सांगली येता-येता जमीन नापीक बनू लागली. आपण आपल्पया सुरक्षेतेसाठी श्वापादना मारण्याकरता अन्न तयार करता करता माणसांना मागण्यासाठी शास्त्र तयार करू लागलो. अतिरेक व दुरुपयोग शेवटी माणसाला नाशाकडे घेऊन जाते म्हणून आपण विज्ञानाकडे कसे पाहतो त्याचा कसा उपयोग करून घेतो यावर विज्ञान हे लाभदायक आहे की नुकसानदायक हे ठरणार आहे.

विज्ञान आणि मानव १०० ओळी निबंध | Science and Human 100 Lines Essay

 

2 thoughts on “विज्ञान आणि मानव १०० ओळी निबंध | Science and Human 100 Lines Essay”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा