संगणक शाप की वरदान निबंध मराठी Sanganak Shap Ki Vardan Marathi Nibandh

संगणक शाप की वरदान निबंध मराठी १०० ओळी | Sanganak Shap Ki Vardan Marathi Nibandh

प्रस्तावना
संगणक शाप की वरदान निबंध मराठी १०० ओळी Sanganak Shap Ki Vardan Marathi Nibandh: आधुनिक संगणक हा विज्ञानाचा एक चमत्कार आहे. पण भारतासारख्या विकसनशील राष्ट्राला संगणकाचा वापर हानीकारक ठरणार की लाभदायक? संगणक श्राप ठरेल की वरदान? हे प्रश्न बहुचर्चित ठरले आहेत. एक संगणक साधारण पंधरा माणसाचे काम करतो. संगणकाच्या सहाय्याने कामे करणारा यंत्रमानव तर एका वेळी साधारण पन्नास माणसाचे कामे करू शकतो. आणि तेही कमी वेळात आणि अगदी अचूक. संगणक अवकाशयाने नियंत्रित करू शकतो. पाणबुडी यांवर नियंत्रण करतो आणि जमिनीवरील जे जे कामे मानव करतो ते सर्व कामे तो करतो.

संगणक शाप की वरदान निबंध मराठी १०० ओळी | Sanganak Shap Ki Vardan Marathi Nibandh

भारतात सध्या प्रवासी वाहनात जागांचे आरक्षण करण्यासाठी तसेच सर्व प्रकारच्या परीक्षेचे डिजिटल स्वरूपाचे कामे करण्यासाठी एक संगणकाला वेठीला धरले आहे. आता बँकेमध्ये ही संगणकाचा उपयोग करण्यास सुरुवात झालेली आहे. जेथे विषारी वायूंचा धोका आहे तेथे संगणक नियंत्रित यंत्रमानवाचा प्रयोग करून प्राणहानी टाळली जाऊ शकते. संगणकामुळे कमीत कमी चुका टाळता येतात त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते. अर्थातच वस्तू कमी दरात विकत येते या साऱ्यांमुळे जागतिक बाजारपेठेतील मालाची मागणी वाढते व त्यामुळे मिळणाऱ्या परकीय चलनात वाढ होते.

संगणक माणसाला बाजूला सारून काम करतो. त्यामुळे भारताच्या संगणकाचा वापर हा शापच आहे असे वाटू लागते. त्यामुळे भारतात संगणकाचा वापर आधीच त्यामध्ये भारतामध्ये वाढत असलेली बेरोजगारी अशिक्षितपणा निरक्षरता या साऱ्या  गोष्टी भारतासमोर आहेत. या गोष्टीला कसे सामोरे जायचे याचे धोरण भारत सरकार ठरवत आहे.

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात असे संगणकाच्या चांगल्या व वाईट दोन्ही बाजू आहेत. अणुबॉम्बने जपानचा सर्वनाश केला. पण त्याच अनुशक्ती आपण विकासासाठी उपयोग करून घेत आहोत. नांगरणी, शिंपणी, माळणी इत्यादी इत्यादींसाठी मोठमोठी अवजारे आपण वापरतो ही अवजारे प्रथम वापरात आली त्यावेळेस असे संकट मजुरांवर आले होते त्याला आपण तोंड दिले. तसेच संगणकाचा उपयोग केल्यावर निर्माण होणाऱ्या बेरोजगारांना दुसरीकडे रोजगार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करता येईल. संगणकाचा उपयोगाने आर्थिक बचत खूप होईल या आर्थिक बळाचा उपयोग करून अधिकाधिक उद्योगधंदे निर्माण करता येईल संगणक तयार करण्यासाठी तसेच संगणकातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी संगणकाला लागणारे प्रोग्राम्स बनवण्यासाठी अनेक प्रशिक्षित माणसांची आवश्यकता असते बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन या कामात त्यांना गुंतवता येईल.

 संगणक विज्ञानाचे एक अपत्य आहे. मानवाला विज्ञान यांनी दिलेला एक प्रभावी साधन आहे ते व संगणकाचा वापर करून मानवासाठी जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्यात करण्याकरता केल्यास संगणक हे मानवाला लाभलेले वरदान ठरेल यात काही शंका नाही. आज भारतीय तरुण संगणकतज्ञ अमेरिकेतील ‘सायबर लॉबी’ सांभाळताहेत आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणक हा आवश्यक आहे. मग सांगा संगणक हा भारताला वरदान नाही का? संगणकासाठी माणूस नसून माणसासाठी संगणक आहे; हे लक्षात ठेवले म्हणजे संगणकाची धास्तीच उरणार नाही. 

मराठी निबंध Video मध्ये हवे असतील तर पुढील लिंक वर क्लिक करा: Click Here

संगणक शाप की वरदान निबंध मराठी १०० ओळी | Sanganak Shap Ki Vardan Marathi Nibandh

Spread the love

Related Posts

2 thoughts on “संगणक शाप की वरदान निबंध मराठी १०० ओळी | Sanganak Shap Ki Vardan Marathi Nibandh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!