Maza Avadta Lekhak Essay In Marathi Language (माझा आवडता लेखक)

माझा आवडता लेखक १०० ओळी निबंध | Maza Avadta Lekhak Essay In Marathi Language

प्रस्तावना
माझा आवडता लेखक १०० ओळी निबंध Maza Avadta Lekhak Essay In Marathi Language: मराठी मधील ज्येष्ठ साहित्यकार पु.ल. देशपांडे यांना आज कोण ओळखत नाही त्यांचे संपूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असे होते. त्यांनी आपल्या कलाकृतीतून अनेक अजरामर साहित्य निर्माण केलेले आहे जसे की ‘बटाट्याची चाळ’ यामध्ये साहित्य मध्ये उभी केलेली व्यक्तिरेखा आजही बोलक्या वाटतात. पु ल देशपांडे यांनी मराठी साहित्याला खूप उंचावर नेऊन ठेवलेले आहे. आणि त्यांची विनोदबुद्धी तर अफाट आहे म्हणून मला पु. ल. देशपांडे हे खूप आवडतात.

माझा आवडता लेखक १०० ओळी निबंध | Maza Avadta Lekhak Essay In Marathi Language

पु. ल. देशपांडेच्या या साऱ्या यशाचे बीज त्यांच्या लहानपणापासून आढळते. आपल्या भोवताली घडणाऱ्या घटना, भोवताली भेटणारी माणसे यांचे ते सूक्ष्म निरीक्षण करत असत आणि त्या साऱ्या लकबी त्यांच्या स्मृतिपटलावर अचूक टिपल्या जात असत. म्हणून तर त्यांच्या ‘बटाट्याची चाळ’ या पुस्तकात आपल्याला एवढी माणसे भेटतात . त्यातला प्रत्येक माणूस वेगळा आहे.

पु. ल. देशपांडे च्या प्रज्ञेचा आणखी एक विशेष म्हणजे त्यांच्या लेखनातील हास्य व कारुण्य यांचा अप्रतिम मिलाफ असलेला विनोद! शब्दाशब्दांवर ते लीलया कोटी करत असत. त्यांचे ‘कोट्यधीश’ हे पुस्तक सर्वांना कोणत्याही परिस्थितीत खुलवते.

पु. ल. नी नाट्यलेखनही केले. त्यातल्या बऱ्याच नाटकांची मूळ कल्पना परभाषीय साहित्यातून घेतली गेली आहे; पण त्यावरचा साज खास मराठी आहे. म्हणून पु. ल. ची ‘फुलराणी’ परकी वाटत नाही . ती खास मराठमोळी वाटते.

‘तुझे आहे तुजपाशी’ हे पु . लं.चे स्वतंत्र नाटक, त्यातील काकाजींची व्यक्तिरेखा चिरंजीव आहे.

पु. ल. नी अनेक व्यक्तिचित्रे रंगवली. ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘गणगोत’, ‘मैत्र’ यांतील व्यक्तींचे आपल्याशी गणगोत जुळते.

‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील ‘अंतू बर्वा’, ‘चितळे मास्तर’ आजही वाचकांचे डोळे ओले करतात. त्यांच्या या लेखनात विनोदाबरोबर करुणरस जागोजाग आढळतो. पु. ल. नी भरपूर प्रवास केला आणि तो आपल्या लेखणीतून अमर केला.

अपूर्वाई, पूर्वरंग, वंगदेश अशा अनेक पुस्तकांतून पु. ल. नी विविध स्थाने साकार केली. त्यांची ‘निळाई’ वाचल्यावर ते स्थळ न पाहताही, पाहिल्याचा आनंद आपण मिळवू शकतो.

पु. लं. नी वर्णन केलेली स्थळे आपण जेव्हा पाहतो, तेव्हा आपल्याला पुन: प्रत्ययाचा आनंद मिळतो. पु. लं  मधील साहित्यिक हा खरा साहित्यप्रेमी होता. त्यामुळे त्यांनी अनेक नवोदित साहित्यिकांना वेळोवेळी उत्तेजन दिले. त्यांनी वेळोवेळी अनेक अभ्यासपूर्ण भाषणे केली.

ती ‘श्रोतेहो’ इत्यादी तीन पुस्तकांत संकलित करण्यात आली आहेत. पु. ल. आणि त्यांची पत्नी सुनीताताई यांना कविता वाचायला, म्हणायला आवडत; पण हा आनंद त्यांनी आपल्यापुरताच मर्यादित ठेवला नाही, तर बा. भ. बोरकर, आरती प्रभू आणि बा. सी. मर्डेकर यांच्या कविता त्यांनी रसिकांना वाचून व गाऊन दाखवल्या. त्यांना काव्यवाचनाचा आगळा आनंद दिला. पु.लं.नी जीवनभर लोकांना आनंद दिला.

स्वत:ला मिळालेला आनंद ते सतत इतरांना देत गेले. आपल्या साहित्यातून, एकपात्री प्रयोगांतून मिळालेले लक्षावधी रुपये त्यांनी विविध सत्कार्यासाठी दान दिले. त्यातही आपण केलेले दान इतरांना समजू नये, अशी त्यांची धडपड असे. त्यामुळे १२ जून, २००० रोजी जेव्हा पु. लं.चे निधन झाले, तेव्हा आपल्याच घरातील कोणीतरी गेले, अशी सर्वांची भावना झाली होती.

माझा आवडता लेखक १०० ओळी निबंध | Maza Avadta Lekhak Essay In Marathi Language

Spread the love

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!